Free Covid Booster Dose


22 May 2021

१८ वर्षे वरील पात्र लाभार्थ्यांना कोविड -१९ लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिने अथवा २६ आठवडे पूर्ण झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक मात्र (बुस्टर डोस) विनामूल्य दिली जाणार आहे.  केंद्र सरकार ने देशाच्या स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून, १५ जुलै ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीपर्यंत " कोविड लस अमृत महोत्सव " उपक्रमाचे आयोजन केले आहे. या ७५ दिवसाच्या कालावधीत वय वर्षे १८ वरील सर्व पात्र लाभार्थ्यांना कोविड लसीचा बुस्टर डोस विनामूल्य देण्यात येणार आहे तरी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा..