राजर्षी शाहू महाराज : सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ - पद्माकर मुळे


22 May 2021

जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या छत्रपती शाहू महाराज म्हणजेच यशवंतराव जयसिंगराव घाटगे यांची आज १५० वी जयंती. आज कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संस्थेचे सचिव श्री. पद्माकरराव मुळे, कोषाध्यक्ष श्री. विठ्ठलराव लहाने आणि विश्वस्त श्री. समीरभैय्या मुळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी श्री. पद्माकरराव मुळे यांनी आपल्या  छोटेखानी मनोगतात छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयीच्या जीवनपटावर प्रकाश टाकला.