'गंगामाई' च्या शिवारात नावीन्यपूर्ण, प्रयोगशील शेतीची बीजे


22 May 2021

औरंगाबाद येथील जेष्ठ व आघाडीचे उद्योजक पद्माकरराव मुळे यांच्या मार्गदर्शनातून व नेतृत्वातून 'गंगामाई कृषी उद्योग' उभारला आणि विकसितही पावला. यशस्वी, प्रयोगशील व नव्या दृष्टिकोनाने युक्त शेतीची बीजे या उद्योगाने मराठवाड्यासह राज्याच्या मातीत पेरली आहेत. जिल्ह्यात चार ठिकाणी असलेल्या उद्योगाच्या जमिनीत खजूर, ड्रॅगन फ्रुट, महोगनी वृक्ष, लिंबू, ऍव्होकॅडो, संत्रा, मोसंबी आदी महत्वपूर्ण फळपिकांची व वृक्षांची शेती केली जाते आहे. विज्ञान तंत्रज्ञानाचा आधार व जोडीला उत्कृस्ट व्यवस्थापनातून होत घडवली जात असलेली हि शेती समस्त शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक अशीच आहे.