राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी.


CSMSS Campus, Chhatrapati Sambhajinagar
6 May 2024
शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, महिला सबलीकरण बदलांसाठी झटणारे, समता, बंधुता यांची शिकवण देणारे आधारस्तंभ म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर संस्थानचे छत्रपती असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांची 6 मे रोजी पुण्यतिथी. 26 जून 1874 रोजी जन्मलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे 6 मे 1922 मध्ये निधन झाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०२ व्या पुण्यतिथी निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष मा. रणजितभैय्या मुळे व विश्वस्त मा. समीरभैय्या मुळे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.