"बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पाऊले" ..


22 May 2021
संतश्रेष्ठ कबीर सांगतात की कबीर संगति साथ की, कदे न निरफल होई, चंदन होसी बांवना, नींब न कहसी कोई || या दोह्याचा अर्थ असा की संतांची संगत कधीच व्यर्थ जात नाही, जसं चंदनाच्या सान्निध्यात येणारं कडुनिंबाचं झाडही सुगंधित होतं. याप्रमाणेच समाज महर्षी श्री. पद्माकरकाका मुळे यांच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रेरित होते, त्यांना भेटल्यावर प्रसन्न व धन्यतेचा अनुभव येतो. कायम हसतमुख व प्रसन्न असणा-या श्री. पद्माकर काकांकडे पाहिल्यावर जगण्याची नवी प्रेरणा मिळते. ते आपल्या पाठीशी असतील तर सर्व संकट, समस्या व अडचणी पळून जातील, असंच आम्हांला नेहमीचं वाटतं.